Sunday, 25 October 2020

मराठी मेळवावी

मराठी बोलवावी

मराठी वसे हृदयी

सहजी ग 


मराठीचा उदित सूर्य

मराठीचा शितळ चंद्र

मराठीचा मंद समीर

वाहू द्यावा


इये बृहन्महाराष्ट्री

बोले मराठी बोल

सांभाळी सान थोर

कवतुके


मराठी आमुची माय

मराठी आमुची धाय

अमृत ऐसी दुग्ध धार

संचितावी 

--------अलकनंदा साने